AgroStar
खुशखबर; महाराष्ट्र मेट्रोमध्ये विविध जागांसाठी पदभरती!
नोकरीलोकमत न्युज१८
खुशखबर; महाराष्ट्र मेट्रोमध्ये विविध जागांसाठी पदभरती!
महाराष्ट्रात सध्या नागपूर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी मेट्रोचं काम वेगानं सुरु आहे. त्यात नागपूर आणि मुंबईतील मेट्रो काही प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. म्हणूनच आता नागपुरातील महा मेट्रोमध्ये पदभरती होणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर इथे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी एकूण 18 जागांवर पदभरती होणार आहे. या जागा आहे रिक्त👇 व्यवस्थापक (Manager), सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) वयोमर्यादा👇 व्यवस्थापक (Manager) - 40 वर्षे सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) - 35 वर्षे शैक्षणिक पात्रता👇 व्यवस्थापक (Manager) - BE (Electronics or Electronics and Telecommunication) सहाय्यक व्यवस्थापक (Assistance Manager) - BE (Electronics or Electronics and Telecommunication) अर्ज पाठवण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010 या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2021 आहे. सविस्तर नोटिफिकेशन बघण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा https://drive.google.com/file/d/1Qz6jJOaLxz9jKnD299EzeaI81oxOa5OT/view 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
16
इतर लेख