AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खुशखबर! आता फक्त 633 रुपयांना मिळणार गॅस सिलेंडर!
समाचारMarathi abplive
खुशखबर! आता फक्त 633 रुपयांना मिळणार गॅस सिलेंडर!
➡️नव्याने गॅस सिलेंडर बुक करणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सिलिंडर आता स्वस्तात मिळणार आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे. यामध्ये गॅस सिलिंडर स्वस्तात म्हणजेच फक्त ६३३ रुपयांमध्ये मिळणार आहे. ➡️सध्या देशात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत इंडेन कंपनी फक्त ६३३ रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देत आहे. इंडेनने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कंपोझिट सिलिंडर आणले आहे. हा सिलिंडर फक्त ६३३.५ रुपयांत येत आहे. शिवाय हे सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवणे शक्य आहे. ➡️कंपोझिट सिलेंडर वजनाने हलके आहेत आणि त्यात १० किलो गॅस मिळणार आहे. त्यामुळेच या सिलिंडरची किंमत कमी आहे. ➡️हा सिलिंडर सध्या २८ शहरांमध्ये उपलब्ध आहे. परंतु तो लवकरच सर्व शहरांमध्ये उपलब्ध होईल. IOCL च्या वेबसाइटनुसार, या सिलिंडरची मुंबईत किंमत इंडियन ऑइलने दिली आहे. संदर्भ:-Marathi abplive, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
9
इतर लेख