AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खादी बाजारात आणणार 'वैदिक पेंट'; जाणून घ्या काय असतील शेतकर्‍यांना फायदे.
कृषि वार्ताकृषी जागरण
खादी बाजारात आणणार 'वैदिक पेंट'; जाणून घ्या काय असतील शेतकर्‍यांना फायदे.
➡️भारत सरकारकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ➡️यामध्ये आता गायीच्या गोबरपासून बनवलेल्या 'वेदिक पेंट चा देखील समावेश होणार आहे. खादी कडून लवकरच तो बाजारात आणला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ➡️दरम्यान हा निर्णय ग्रामीण अर्थवस्थेला सक्षम करण्यासाठी घेतल्याचं त्यांनी सांगितले आहे. गोमूत्र, गायीचे शेण विक्रीस केंद्र सरकार देणार प्रोत्साहन, ६०% निधी देऊन करु शकते स्टार्टअप. ➡️नितीन गडकरी यांच्या ट्वीटनुसार, 'ग्रामीण अर्थव्यवस्थेला' बळ मिळण्यसाठी आणि शेतकर्‍यांना उत्पन्नाचं एक अधिकच साधन म्हणून खादी व ग्रामोद्योग आयोगच्या माध्यमातून लवकराच 'वेदिक पेंट' बाजारात उपलब्ध केले जाईल.' असे सांगितले आहे. नितीन गडकरी यांचं ट्वीट ➡️वेदिक पेंट हे डिस्टेंपर आणी इमल्शन मध्ये येणार आहे. हे पर्यावरणपूरक पेंट असेल. सोबतच विना-विषारी, जीवाणूविरोधी, बुरशीजन्य आणि धुण्यायोग्य आहे आहे. केवळ ४ तासामध्ये ते सुकणार आहे. ➡️यामुळे पशूधन ठेवणार्‍या शेतकर्‍यांना वर्षाला ५५ हजार रूपयांचं अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. ➡️मागील काही वर्षांमध्ये देशात खादीच्या उत्पादनाची विक्री सुधारली आहे. ‘वोकल फॉर लोकल’चा नारा पंतप्रधानांनी दिल्यापासून सर्वत्र 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तू विकत घेण्याकडेही अनेकांचा कल वाढला आहे. ➡️याचा फायदा अनेक ग्रामीण, लहान उद्योजकांना होत आहे. एमएसएमईनेदेखील विक्रीमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं आहे. संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
85
22