AgroStar
खात्यातून पैसे गहाळ झाल्यास इथे करा तक्रार!
कृषी वार्तालोकमत न्युज१८.
खात्यातून पैसे गहाळ झाल्यास इथे करा तक्रार!
जर तुमच्यासोबत पैशांच्या बाबतीत फ्रॉड झाला असेल तर चिंता करण्याची गरज नाही. तुमचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक तक्रार करावी लागेल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच टपाल कार्यालयाने यासाठी फॉर्म सुरू केले आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार करून तुमच्या खात्यातून गहाळ झालेल्या पैशांसाठी क्लेम करू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने Simplified Standardized Claim Form लाँच केला आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही पैशांसाठी क्लेम करू शकता. चला तर जाणून घेऊया कोणत्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास तुम्ही क्ले करू शकता ते. पैशांसाठी कोण क्लेम करू शकतं? 👉 पोस्ट पेमेंट बँकेने याबद्दल सविस्तर माहिती देताना म्हटलंय की, जर ग्राहकांच पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट असेल आणि त्यांची फसवणूक झाली असेल तर ते पैशांसाठी क्लेम करू शकतात. याशिवाय कॅश सर्टिफीकेट, मनी ऑर्डर, SOP आणि PLI/RPL मध्ये जर तुमची फसवणूक झाली असेल तरीही तुम्ही पैशांसाठी क्लेम करू शकता. तक्रार कशी करायची?🤔 - तुम्हाला तक्रार करायची असेल तर सर्वात आधी हा फॉर्म घेऊन तुम्हाला भरावा लागेल. - हा फॉर्म सबमिट करताना सेल्‍फ अटेस्‍टेड फोटोकॉपी द्यावी लागेल. - या फोटोकॉपी मध्ये Photo ID आणि Address proof देणं गरजेचं आहे. - याशिवाय तुम्हाला Passbook आणि Deposit receipt देखील द्यावी लागेल. - तसेच तुम्हाला Original Passbook देखील सबमिट करावं लागू शकतं. - त्यानंतर बँकेकडून तुम्ही केलेल्या तक्रारीबद्दलची पूर्ण चौकशी केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेस किती कालावधी लागणार?🤔 👉 तुम्ही फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर या प्रक्रियेस 7 दिवस ते 25 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. तुम्ही केलेल्या तक्रारीवरून हा कालावधी ठरेल. तसेच जर एखाद्या तक्रारीच्या चौकशीत Forensic examinationची गरज पडली तर तीन महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
6
इतर लेख