AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीप हंगामातल्या 2019-20 मधील प्रमुख पिकांचा अंदाज
कृषी वार्ताAgrostar
खरीप हंगामातल्या 2019-20 मधील प्रमुख पिकांचा अंदाज
नवी दिल्ली: यंदाच्या म्हणजेच वर्ष 2019-20 मधल्या खरीप पिकांचा प्राथमिक अंदाज कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केला. आत्तापर्यंत विविध राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर हा प्राथमिक अंदाज तयार करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार देशात यंदा अन्नधान्याचे एकूण उत्पादन 140.57 दशलक्ष टन एवढे होईल. यामध्ये तांदूळ 100.35 दशलक्ष टन, पोषक कडधान्य 32 दशलक्ष टन, डाळी- 8.23 दशलक्ष टन, तूर- 3.54 दशलक्ष टन, मका- 19.89 दशलक्ष टन अशा विविध धान्यांचा समावेश आहे.
105
0
इतर लेख