AgroStar
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीप मका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण!
• यावर्षी लष्करी अळीचा प्रादुर्भाव या मान्सूनच्या मका पिकामध्ये होण्याची शक्यता आहे. मका पेरल्यापासून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. • एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम): • घट्ट साल, आवरण असलेले मक्याचे वाण निवडा. • सायंट्रेनिलीप्रोल १९.८% + थायोमिथॉक्सम १९.८% ईसी @४ मिली / कि.ग्रा. बीजप्रक्रिया करावी. • तूर, उडद व मूग या पिकांसोबत मका पीक आंतरपीक म्हणून घ्यावे. • शेताच्याभोवती सापळा पीक म्हणून नेपियर गवत लावावे. • १० पक्षी जाळे प्रति एकर तयार करावे आणि प्रति एकर १५ फेरोमोन सापळे बसवावे. • पिकांमध्ये आढळलेल्या किडीची अंडी गोळा करून नष्ट करावे. • उपलब्ध असल्यास परजीवी, ट्रायकोग्रामा @५०,००० / एकर सोडावे. • मेटारिझियम निसोप्लिया हे जैव कीटकनाशक @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात किंवा बॅसिलस थुरिंजिन्सिस हि जिवाणूजन्य आधारित पावडर प्रति हेक्टर ७५० ग्रॅम वापरावी. • प्रथम फवारणी - निम आधारित फॉर्म्युलेशन्ससह @२० मिली (१% ईसी) ते ४० मिलीलीटर (०.१५% ईसी प्रति १० लिटर पाण्यात) - रोपांच्या सुरुवातीच्या काळातील अवस्थेपर्यंत द्यावे. • इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी @४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५एससी @३ मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅंबडा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी @ ५ मिली किंवा क्लोरंट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दुसऱ्या फवारणीपूर्वी द्यावे. • विष आमिष म्हणून (तांदळाचा कोंडा १० किलो + गूळ २ किलो + थायोडीकार्ब ५० डब्ल्यूपी १०० ग्रॅम + पाणी २ लिटर) यांचे मिश्रण पानांजवळ किंवा पोंग्यात टाकावे. • संदर्भ : मोंगाबे इंडिया
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
49
1
इतर लेख