AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीप कांदा काढणीचे नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीप कांदा काढणीचे नियोजन!
👉 पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांनी करावी. 👉 कांदा काढणीआधी १० दिवस पाणी देणे बंद करावे. 👉 खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही. 👉 अशावेळी काढणीच्या २ ते ३ दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडून घ्याव्यात. 👉 शेत कोरडे असताना काढणी करावी. 👉 कांदा काढणीनंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. 👉 कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब मान ठेवून कापावी. 👉 नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे, चिंगळी कांदे काढून टाकावेत. 👉 चांगले कांदे गोळा करून सावलीत १० ते १२ दिवस राहू द्यावेत. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
6
इतर लेख