AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीप कांदा उत्पादनात ४० टक्के घट – पासवान
कृषी वार्तासकाळ
खरीप कांदा उत्पादनात ४० टक्के घट – पासवान
नवी दिल्ली – देशातील उत्पादक पट्टयात यंदा पावसाच्या तुटीमुळे खरीप कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. या कारणाने खरीप कांदा उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर अतिपावसामुळेही कांदा पिकाचे मोठे नुकसान होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर व पुरवठयावर झाला. परिणामी कांदयाचा तुटवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली.
कांदयाचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यातच अतिपावसामुळे देखील कांदा पिकाला फटका बसला असून बाजारात कांदा पुरवठा कमी होत आहे. दिल्ली येथील बाजारात सध्या मागील वर्षी याच काळत असलेल्या आवकेच्या जवळपास २५ टक्के कमी आवक झाली आहे. महाराष्ट्र हे कांदा उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे. येथील नाशिक जिल्हयात देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन होते. मात्र, यंदा मागील वर्षीच्या कमी पावसामुळे खरीप लागवडीवर प्रभावित झाल्या होत्या. त्याचबरोबर कमी पाण्यामुळे उत्पादकतेवर परिणाम झाला. एकूण सर्व घटनांमुळे बाजारात कांदा आवक कमालीची घटली आहे, असे ग्राहक कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. संदर्भ – सकाळ, ८ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा.
214
0