कृषि वार्ताTech With Rahul
खरीप ई-पीक पाहणीची नोंदणी सुरु
👉🏼राज्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. शेतकरी आजपासून ई-पीक पाहणीची नोंदणी करू शकतील. विशेष म्हणजे भ्रमणध्वनीवर आता ई-पीकपाहणीच्या नोंदणीसाठी सुधारित उपयोजन (अपडेटेड अँप्लिकेशन) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ‘खरीप हंगाम 2023 ’ करिता राज्यातील शेतकरी नवे अद्ययावत उपयोजन 2.0.11 (ई-पीक पाहणी अपडेटेड व्हर्जन) वापरु शकतील. त्यासाठी आधी भ्रमणध्वनीमधील ‘गुगल प्लेस्टोअर’ वर जाऊन नवे उपयोजन डाऊनलोड करून घ्यावे लागेल. नव्या उपयोजनमुळे ई-पीकपाहणीची नोंदणी जलद व सुलभ पद्धतीने होईल.
👉🏼संदर्भ:- Tech with rahul
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.