AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरिपातील या एका पिकाचा शेतकऱ्यांना दिलासा!
बाजार बातम्याtv9marathi
खरिपातील या एका पिकाचा शेतकऱ्यांना दिलासा!
➡️केवळ सोयाबीनवरच नाही तर सबंध खरीप हंगामावरच यंदा नैसर्गिक संकट होते. अतिवृष्टी, अवकाळी आणि पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादनात घट झाली असली तरी जे पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे त्याचे खऱ्या अर्थाने चीज होत आहे. कारण कापसाला १० हजाराचा दर मिळालेला आहे. त्यामुळे आवकही वाढली आहे. ख ➡️खरीप हंगाम अतिम टप्प्यात असताना कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूकीचा घेतलेला निर्णय आज फायदेशीर ठरत आहे. सरकीच्या दरातही दुपटीने वाढ ➡️कापसाच्या दरात वाढ झाल्याने आपोआपच सरकीच्या दरातही वाढ झाली आहे. सरकी हे पशूखाद्य म्हणून वापरले जाते. यापूर्वी २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असलेली सरकी आता थेट ४ हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे दुबत्या जनावरांना आवश्यक असलेले खाद्य आता महागले आहे. त्यामुळे शेतकरी आता अन्य पर्यायाचा शोध घेत आहेत. मात्र, खुल्या बाजारपेठेत कापसाने १० हजारी ओलांडली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. ➡️नववर्षाच्या सुरवातीपासून सुरु असलेल्या या दरवाढीने आता १० हजाराचा टप्पा गाठलेला आहे. त्यामुळे खरिपातील सर्व पिकांमधून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नसले तरी मात्र, पांढऱ्या सोन्याने दिलासा दिलेला आहे. आवकमध्ये विक्रमी वाढ ➡️वाढलेल्या दराचा परिणाम कापूस आवकवर झालेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत असल्याने खरेदी केंद्रावर आवक वाढलेली आहे. दिवसाकाठी १० हजार क्विंटलची आवक होत आहे. शिवाय अजूनही दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी टप्प्याटप्प्याने विक्री करीत आहेत. बाजारपेठेतले गणित शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानेच हा बदल होत आहे. संदर्भ:- TV9Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
5
इतर लेख