AgroStar
खत, पाणी आणि किडी यांच्यातील संबंध!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खत, पाणी आणि किडी यांच्यातील संबंध!
• जमिनीची मशागत करताना कुजलेले शेणखत/कंपोस्ट/गांडूळ खत वापरुन कोणत्याही पिकामध्ये किडींची संख्या कमी करता येते._x000D_ • वरील सेंद्रिय खताऐवजी, निंबोळी पेंड/केक किंवा एरंड केक देखील वापरले जाते. यांच्या वापर केल्यास जमिनीतील वाळवी कीड नियंत्रित करता येते._x000D_ • खतांची शिफारशी नुसार मात्रा द्यावी. नायट्रोजन खतांचा जास्त आणि वारंवार वापर केल्यास किडींची संख्या वाढते._x000D_ • यूरिया खत वापरण्याऐवजी विभाजित डोसमध्ये अमोनियम सल्फेट वापर केल्याने धान पिकांमध्ये पिवळसर/तपकिरी वाढ कमी होते._x000D_ • फॉस्फरस आणि पोटॅश खतांचा वापर केल्यामुळे पिकातील मजबूतपणा वाढतो आणि किडींमुळे होणारे नुकसान कमी होते._x000D_ • कडधान्य पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव बागायती क्षेत्रापेक्षा कोरडवाहू क्षेत्रात कमी दिसून येतो._x000D_ • ऊस पिकामध्ये पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास, पाण्याचे अधिक प्रमाण झाल्यास ऊसामध्ये खोडअळीचा आणि पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार पाण्याचे नियोजन करावे._x000D_ • खतांचा आणि पाण्याचा जास्त वापर केल्यामुळे पिकाची शाखीय वाढ पिकाच्या गरजेपेक्षा जास्त होते, ज्यामुळे पानांवर उपजीविका करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो._x000D_ • भात पिकामध्ये वारंवार पाणी देणे टाळा. पिकांमधील हॉपर/ तुडतुडे नियंत्रित करण्यासाठी जादाचे पाणी बाहेर काढून टाका._x000D_ • गव्हासारख्या पिकाला हलके सिंचन दिल्यास वाळवी किडीचा प्रादुर्भाव कमी होतो._x000D_ • टोमॅटो पिकांमधील फळ पोखरणाऱ्या अळीपासून संरक्षण करण्यासाठी तुषार सिंचना ऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा._x000D_ • भेंडी सारख्या पिकांमध्ये सिंचनाचा कालावधी वाढविल्यास फळ पोखरणाऱ्या अळीमुळे होणारे नुकसान कमी होते._x000D_ • जर पिकाचे नुकसान नसल्यास एकदा जास्त सिंचन दिल्यास शेतातील उंदीर आणि घूसमुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
254
3
इतर लेख