AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खत ओरिजिनल आहे की बनावट?
कृषि वार्ताAgroStar
खत ओरिजिनल आहे की बनावट?
शेतीसाठी मातीची सुपीकता अत्यंत महत्त्वाची असते. माती चांगली नसल्यास पिक चांगले येत नाही. बंजर जमिनीत पोषक घटकांची कमतरता असते. अशा वेळी शेतकरी पोषक घटकांची भरपाई करण्यासाठी खतांचा वापर करतो. दरवर्षी देशात लाखो टन खतांचा वापर पिकांच्या उत्पादनासाठी केला जातो. बाजारात देखील विविध प्रकारची खते उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत हे ओळखणे महत्त्वाचे ठरते की कोणते खत खरे आहे आणि कोणते बनावट? चला जाणून घेऊया खताची खरी ओळख कशी करायची: 👉🏻युरिया युरियाचे दाणे पांढऱ्या, चमकदार आणि जवळपास समान आकाराचे असावेत. हे पाण्यात पूर्णपणे विरघळते. या द्रावणाला स्पर्श केल्यास गारवा जाणवतो. तव्यावर गरम केल्यावर ते वितळते आणि आंच वाढवल्यावर कोणताही अवशेष राहत नाही. 👉🏻पोटॅश पांढऱ्या कडकसर दाण्यांनी पोटॅशची ओळख होते. त्याचा रंग मिठासारखा व लाल तिखटासारखा दिसतो. पोटॅशचे दाणे गरम केल्यावर एकमेकांना चिकटत नाहीत, हीच त्याच्या खऱ्या असण्याची खूण आहे. पाण्यात विरघळल्यावर त्याचा लाल भाग पाण्यावर तरंगतो. 👉🏻झिंक सल्फेट झिंक सल्फेटचे दाणे हलक्या पांढऱ्या, पिवळ्या आणि तपकिरी रंगाचे असतात. हे अतिशय बारीक असते. यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट मिसळले जाते. झिंक सल्फेट ओळखणे थोडे कठीण असते, परंतु डीएपीच्या द्रावणात झिंक सल्फेट मिसळल्यास थक्क्यासारखा घन बनतो. 👉🏻डीएपी डीएपीमध्ये तंबाखूच्या चुऱ्यासारखे चूर्ण मिसळून घासल्यावर प्रखर वास येतो. तव्यावर गरम केल्यास दाणे फुगू लागतात. हे कठोर, तपकिरी, काळ्या व बादामी रंगाचे असते. नखाने ओरखडल्यावर ते सहज तुटत नाही. 👉🏻सुपर फॉस्फेट सुपर फॉस्फेट गरम केल्यास दाणे फुगत नाहीत तर ते खरे असते. दाणे कठीण, तपकिरी, काळ्या व बादामी रंगाचे असतात. हे नखांनी ओरखडल्यावर तुटत नाही. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख