AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोरोना लसीकरणाचा खरंच फायदा होतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं
सल्लागार लेखसकाळ
कोरोना लसीकरणाचा खरंच फायदा होतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण खरंच प्रभावी ठरेल का यासह अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा... पुणे - कोरोनाची लस टोचल्यावरही विषाणूची बाधा झाल्याची निवडक उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे लसीकरणाचा खरच फायदा होतो का, कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लसीकरण खरंच प्रभावी ठरेल का यासह अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा... ➡️ लसीचा फायदा काय? देशाची सर्वोच्च संशोधन संस्था समजल्या जाणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात, ‘‘सध्या उपलब्ध लसींमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याबद्दल वैज्ञानिक समुदायात ठाम मत तयार झाले आहे. लसीकरणानंतरही जर कोरोना झाला तर त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ (क्रिटिकल) अवस्थेत जाण्याचे प्रमाण जवळजवळ नसल्यात जमा आहे. लसीकरणामुळे केवळ मृत्यूदर कमी होणार नाही तर हॉस्पिटलायझेशन कमी होईल. मागील दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांच्या आधारे जवळ जवळ सर्वच म्युटेशनवर कोरोनाच्या लसी प्रभावी ठरत असल्याचे दिसत आहे. ➡️ लसीच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता का? लशीची पहिली मात्रा शरिरात रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यास सुरवात करते. तर दुसरी मात्र तयार झालेला रोगप्रतिकारशक्तीला ‘बूस्ट’ देते. काही कारणाने पहिल्या मात्रेत रोगप्रतिकारशक्ती कमी विकसित झाली तर दुसऱ्या मात्रेने ती कमी भरून निघते. तसेच दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती टिकविण्यासाठी दुसऱ्या मात्रेची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात. ➡️ लसीच्या दोन मात्रांमध्ये अंतर का? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला सांगतात, ‘‘सुरवातीला कोव्हिशिल्ड लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी २८ दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. त्यामुळे लसीची परिणामकारकता ७० टक्के नोंदवली गेली. आता नव्याने काही संशोधने समोर आले आहे. त्यानुसार अडीच ते तीन महिन्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतल्यास परिणामकारकता ९० टक्क्यापर्यंत वाढते. लान्सेट शोधपत्रिकेत यासंबंधी शोधनिबंध प्रकाशित झाला असून, ऑक्सफर्डच्या वतीनेही याला पुष्टी देण्यात आली आहे. संदर्भ:- सकाळ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
16
इतर लेख