AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोरोना काळात कारलं खा अन् हेल्दी राहा!
आरोग्य सल्लाtv9marathi
कोरोना काळात कारलं खा अन् हेल्दी राहा!
➡️ कारले चविला जरी कडू असले तरी आपल्या आरोग्यासाठी कारले खूप फायदेशीर आहे. कारले अँटीवायरल आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए देखील मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन-सी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. सध्याच्या कोरोना काळात तर आहारात कारले जास्तीत-जास्त घेतले पाहिजेत. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ➡️ आहारात कारले तळून, भाजून, भाजी आणि रस करून घेऊ शकतो. शक्यतो आपण कारल्याची भाजीच करतो. मात्र, कोणत्याही पध्दतीने कारले आपल्या शरीरात जाणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे बरेच लोक कारल्याची शेव देखील करू खातात. कारले इतके कडू असते की, आपण फक्त कारल्याचा रस पिऊ शकत नाही. कारल्याचा रस घरी तयार करण्यासाठी त्या रसामध्ये आपण हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, पालक, कारले, टोमॅटो आणि लसूण यासारख्या निरोगी घटक या रसात मिक्स करू शकतो. ➡️ कारल्याचा रस तयार करण्याची दुसरी रेसिपी म्हणजे आपण कारले आणि बीट मिक्स करून देखील कारल्याचा रस तयार करू शकतो. कारले आणि बीटचा रस तयार करण्यासाठी अर्धे कारले आणि एक बीट घ्या. त्यामध्ये लिंबू देखील मिक्स करा. कारले आणि बीटचा रस तयार करताना त्यामध्ये थोडे पाणी घाला. हा रस दररोज सकाळी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना काळात तर हा रस आपण दररोज सकाळी पिला पाहिजे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
2
इतर लेख