क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तासकाळ
कोरोनाबाबत अशी घ्या काळजी!
कोरोना म्हणजे काय? विषाणूजन्य कोरोना मानवासह प्राण्यांमध्येही आढळतो. सामान्यपणे मानवामध्ये आढळणारा कोरोना आजार श्वसनाशी संबंधित असून, अनेक दिवस सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची लक्षणे आहेत. सध्या जगभर पसरलेल्या कोरोना या विषाणुजन्य आजाराला ‘कोविड १९’ असेही म्हणतात. काही रूग्णांमध्ये अंगदुखी, सांधेदुखी, कोरडा खोकला आदी लक्षणे ही आढळतात. हा आजार अचानक होत नसून हळूहळू या आजाराची लक्षणे दिसून येतात. वातावरण बदलामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या विषाणूजन्य आजाराप्रमाणेच असलेली लक्षणे कोरोनाची असल्याने अनेकजण घाबरतात. मात्र त्यावरील लक्षणे आढळलेल्या रूग्णांनी नेहमीप्रमाणे वैदयकीय उपचार घेतल्यास ते बरेही होत आहेत.
ताप, सर्दी, खोकला आदि उपचार घेऊनही बरे होत नसल्यास तत्काळ विशेष तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे._x000D_ _x000D_ अशी घ्या काळजी_x000D_ १. ठराविक वेळेने तुमचे हात शक्यतो साबणाने अथवा हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. साबणाचा पुरेसा फेस होईल, याची काळजी घ्या._x000D_ २. खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तींपासून इतर व्यक्तींनी किमान एक मीटर (३ फूट) अंतर दूर राहावे._x000D_ ३. हात न धुता डोळे, नाक किंवा तोंडाला लावू नये. विषाणूबाधित हात, डोळे, नाक किंवा तोंडाला लावल्यास त्याची बाधा होण्याची शक्यता असते._x000D_ ४. श्वसनावाटे बाधा होत असल्याने खबरदारी म्हणून मास्क, हॅण्डग्लोव्हजचा वापर करावा. एन – ९५ मास्कमुळे विषाणूजन्य आजारांपासून बचाव करता येतो._x000D_ ५. सर्दी, खोकला, ताप असल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये. तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा._x000D_ _x000D_ _x000D_ संदर्भ – सकाळ, ११ मार्च २०२०_x000D_ _x000D_ कोरोनासंबंधित ही महत्वपूर्ण माहिती लाइक करा अन् आपल्य सर्व मित्रांसोबत शेअर करा._x000D_
512
0
संबंधित लेख