AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी व फुलकोबी पिकातील मावा किडीचे व्यवस्थापन
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबी व फुलकोबी पिकातील मावा किडीचे व्यवस्थापन
साधारणत: शेतकरी वर्षभर कोबी व फुलकोबी पिके घेतात. या दोन्ही पिकांमध्ये मावा किडी आढळतात. या किडी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या किडींचे लागवडीचा कालावधी आणि योग्य कीड नियंत्रणाचा अवलंब करून व्यवस्थापन करता येते. • मावा किडी पानांतून रसशोषण करतात. जास्त प्रादुर्भावाच्या असल्यास, काळ्या काजळीचे मूस तयार झालेले दिसतात. परिणामी, पिकांच्या प्रकाशसंश्लेषण कार्यात अडथळा निर्माण होतो. पानांमध्ये आकसून आणि विकृती येते. शेवटी गुणवत्ता, उत्पादन आणि बाजाराच्या किंमतींवर परिणाम होतो. • ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या पिकांची पुर्नलागवड केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी असल्याचा आढळतो. लागवड उशिरा झाल्यास प्रादुर्भाव वाढतो. • तापमान आणि आर्द्रता वाढल्यास प्रादुर्भाव वाढतो.
• मावा किडीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण तपासण्यासाठी व व्यवस्थापनासाठी शेतात प्रति एकर १० पिवळे चिकट सापळे बसवावे. • लेडीबर्ड बीटल हे कीटक मावा किडीवर उपजीविका करतात, त्यामुळे या किडींची संख्या पिकात जास्त असल्यास कीटकनाशकांचा वापर टाळावा. • 'डायरेटीएला रेपे' हा एक परजीवी कीटक आहे. या कीटकाची संख्या जास्त असल्यास, मावा किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. • रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी निम आधारित कीटकनाशक (५% अर्क) ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी जैविक कीटकनाशकांमध्ये, मावा किडीच्या प्रादुर्भावाच्या सुरूवातीस व्हर्टिसिलियम लॅकेनी ही बुरशी आधारित पावडर किंवा ब्यूव्हेरिया बॅसियाना @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • या किडीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास, नियंत्रणासाठी असिटामाप्रिड २० एसपी @ ३ ग्रॅम किंवा सायनट्रेनीलीप्रोल १० ओडी @ ३ मिली किंवा डायफेनथ्यूरॉन ५० डब्ल्यूपी @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
102
0
इतर लेख