गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबी पिकातील डायमंड बॅक मॉथ किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
कोबीची लागवड शक्यतो वर्षभर केली जाते. भारतात कोबीची लागवड ०.३१ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर केली जात असून, ०.११ दशलक्ष टन उत्पादन घेते. हे पीक गुजरात, उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश आणि कर्नाटक इ. राज्यात घेतले जात असून, पश्चिम बंगाल हे राज्य लागवड क्षेत्र व उत्पादनात अग्रेसर आहे. कोबी पिकामध्ये डायमंड बॅक मॉथ ही कीड प्रामुख्याने आढळून येते. ही कीड प्रथम १९१४ साली हरियाणा या राज्यात आढळून आली होती. त्यानंतर इतरत्र सर्व राज्यांमध्ये ती पसरली. त्याचबरोबर या किडीसोबतच मावा, पाने खाणारी अळी व गड्डा पोखरणारी अळी यांमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जेव्हा पतंग विश्रांतीच्या अवस्थेत असतो, तेव्हा तो डायमंड सारखा दिसतो, म्हणून यास ‘डायमंड बॅक मॉथ’ म्हणून ओळखले जाते. पिवळ्या-हिरव्या अळ्या सुरुवातीला पानांतील हरितद्रव्ये खातात आणि नंतर पानांना छिद्र करतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पिकामध्ये फक्त शिरा दिसतात, पूर्ण पानांचा भाग खाल्ला जातो. त्यामुळे पिकाचे नुकसान होते.
व्यवस्थापन:-_x000D_ - आंतरपीक म्हणून टोमॅटो पिकाची लागवड करावी._x000D_ - सापळा पीक म्हणून मोहरी पिकाची लागवड करावी._x000D_ - प्रति हेक्टर १० फेरोमन सापळे स्थापित करावे._x000D_ - या किडीचा प्रादुर्भाव आढळताच, नियंत्रणासाठी निमार्क (५%) @ ५०० मिली प्रति एकर किंवा बॅसिलस थुरिंजेन्सिस बॅक्टेरिया पावडर @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ - वनस्पतिजन्य किंवा रासायनिक कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये प्रति १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कोणतेही डिटर्जेंट पावडर मिसळावी, यामुळे कीटकनाशकाची कार्यक्षमता वाढते._x000D_ - ही कीड कीटकनाशकांविरूद्ध प्रतिकारशक्ती मिळवते म्हणून प्रत्येक फवारणीवेळी कीटकनाशके बदलावेत._x000D_ - काढणी झाल्यानंतर प्रादुर्भावग्रस्त गड्डे गोळा करुन नष्ट करावे._x000D_ - कोटेसीया प्ल्युटेले ही एक परजीवी कीटक जीवी आहे. या परजीवी कीटकांची संख्या जास्त असल्यास कीटकनाशकाचा वापर टाळावा._x000D_ - जास्त प्रादुर्भाव असल्यास क्लोरोपायरीफॉस २० ईसी @ २० मि.ली. किंवा सायपरमेथ्रीन १० ईसी @ १० मि.ली. किंवा फेंव्हेलेरेट २० ईसी @ ५ मि.ली. किंवा क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @ ३ मि.ली. किंवा क्लोरफेनपायर १० ईसी @ १० मि.ली. किंवा सायनट्रेनॅलिप्रोल १० ओडी @ ३ मिली किंवा डायफेनथ्युरॉन ५० डब्ल्यूपी @१० ग्रॅम किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी @ ३ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ एससी @ १० मिली किंवा फ्लुबेन्डामाइट २० डब्ल्यूजी @ २ ग्रॅम किंवा फ्लुबेन्डामाइट ४८० एससी @ ३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @ ५ मिली किंवा नोव्हालुरॉन १० ईसी @ १० मिली किंवा थायोडिकार्ब ७५ डब्ल्यूपी @ १० ग्रॅम किंवा क्लोरफ्लुझुरॉन ५.४ ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
122
1
इतर लेख