AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी उत्पादकांची दिवाळी होणार जबरदस्त; बाजारात सरासरी २९१५ रुपयांचा भाव!
कृषी वार्ताकृषी जागरण
कोबी उत्पादकांची दिवाळी होणार जबरदस्त; बाजारात सरासरी २९१५ रुपयांचा भाव!
👉 सध्या भाजीपाल्याची शेती करणाऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली असून दरही चांगला मिळत आहे. गेल्या काही दिवसाआधी दिल्लीमध्ये हिरवी मिरची, टोमॉटोला जोरदार भाव होता. 👉 आता कोबीला जबरदस्त दर मिळताना दिसत आहे. नाशिकमधील बाजारात कोबीचे दर उंचावले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. आज कोबीची जवळ-जवळ ८३० क्विंटल आवक झाली. कोबीला २०८५ ते ४ हजार १६५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जर सरासरीचा विचार केला तर ही सरासरी २९१५ रुपये इतका राहिला. कोबीच्या पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने कोबीच्या दरात चांगल्या प्रकारे तेजी असल्याचे माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 👉 अतिपावसाने सगळीकडे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम हा थेट पुरवठ्यावर झाला. मागणीच्या मानाने भाजीपाल्याचा पुरवठा हा कमी असल्याने भाजीपाला चांगला दर मिळत आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
4