अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोथिंबीर लागवडी विषयी महत्वाची माहिती!
• व्यापारीदृष्ट्या कोथिंबिरीची (धना ) लागवड सुधारित पद्धतीने करणे फायद्याचे ठरते.
• या पिकास थंड हवामान मानवते. अति पर्जन्यमान व आर्द्रतेचा कालावधी सोडल्यास कोथिंबिरीची वर्षभर लागवड करता येते.
• लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करावी.
• कोथिंबीर पेरणीसाठी ३ * २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
• कोथिंबिरीची पेरणी बी फोकून करतात किंवा २० सें.मी. अंतरावर रेषा पाडून बी पातळ पेरणी करता येते.
• कोइमतूर- १, कोइमतूर- २, लाम सीएस- २, लाम सीएस- ४, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या जातींची निवड करावी.
• बी पेरणी अगोदर धणे रगडून त्यांचे दोन भाग करावे.
• धण्यासाठी पीक घ्यावयाचे असल्यास हेक्टरी १५ किलो बियाणे लागते.
• कोथिंबिरीसाठी पीक घेताना हेक्टरी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते.
• बी पेरणीपूर्वी रात्रभर भिजवून पेरल्यास बी लवकर म्हणजे दहा दिवसांत उगवते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.