AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोट्यवधीच्या झाडाला 24 तास सुरक्षा!
समाचारZee News
कोट्यवधीच्या झाडाला 24 तास सुरक्षा!
➡️ कोकणातही सध्या १०० ​कोटींची चर्चा रंगली आहे. पण ही चर्चा आहे एका झाडाची. कोकणात एक असं झाड आह ज्याची किंमत तब्बल १०० कोटीच्या घरात आहे. ➡️ रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं. महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं असताना कोकणच्या जंगलात हे झाड कसं आलं याचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही. ➡️ या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभागही २४ तास अलर्ट असतो. काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिदुर्मिळ झाडासाठी चोख सुरक्षा आहे. ➡️ रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात अतिशय महत्त्व आहे. बाजारामध्ये जवळपास 5 ते सहा हजार रूपये किलो दरानं रक्तचंदनाची विक्री होते. आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः चीनमध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. उंची दारू, आयुर्वेदिक औषधं, मूर्तींसाठी रक्तचंदनाचा वापर होतो. त्यामुळेच या झाडाची तब्बल शंभर कोटी किंमत आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Zee News, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
1