समाचारAgrostar
२७०० कोटी रुपयांचे दावे प्रलंबित!
➡️पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2021- 22 मधील 2700 कोटीचे दावे प्रलंबित, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात माहिती दिली. सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे राजस्थानातील, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे प्रलंबित आहेत.
➡️पंतप्रधान पीक विमा योजनेतील (PMFBY) लाभार्थ्यांचे 2021-22 मधील 2,761.10 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याला मिळणारे पीक विम्याचे पैसे सर्वाधिक प्रलंबित आहेत. या तीन राज्यातील शेतकन्यांना अद्याप अडीच हजार कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही, त्यात महाराष्ट्रातील 336 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील काही शेतकऱ्यांचे (पंतप्रधान पीकविमा योजनेचे) पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.
➡️तोमर यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभाथ्यांचे 2021-22 मधील जुलै जून महिन्यातील 2700 कोटीचे दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणात राज्यस्थान आघाडीवर आहे. त्याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातही दावे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. राजस्थानमध्ये 1387.34 कोटी, महाराष्ट्र 336.22 कोटी, गुजरात 258.87 कोटी, कर्नाटक 132.25 कोटी आणि झारखंड 128.24 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत.
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.