AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
१५००० कोटी रुपयांचा पशुपालन पायाभूत विकास निधी स्थापन करणार!
कृषी वार्ताAgrostar
१५००० कोटी रुपयांचा पशुपालन पायाभूत विकास निधी स्थापन करणार!
नुकत्याच जाहीर झालेल्या आत्मनिर्भर भारत अभियान प्रोत्साहन पॅकेजनुसार१५००० कोटी रुपयांचा पशुपालन पायाभूत विकास निधी स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळाने आज मंजुरी दिली. दुग्धव्यवसाय पायाभूत संरचना विकसित करण्यासाठी, सहकारी क्षेत्राकडून गुंतवणुकीला चालना देण्यासाठी, केंद्र सरकारने याआधी १०००० कोटी रुपयांच्या दुग्धव्यवसाय पायाभूत विकास निधीला मंजुरी दिली आहे. तथापि पशु पालन क्षेत्रात प्रक्रिया आणि मूल्यवर्धन तसेच पायाभूत क्षेत्रात एमएसएमई आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचीही आवश्यकता होती.आज मंजूर झालेल्या पशुपालन पायाभूत विकास निधीमुळे, दुग्ध, मांस प्रक्रिया आणि पशु खाद्य कारखान्यात पायाभूत गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेक्शन ८ कंपन्या, खाजगी कंपन्या आणि वैयक्तिक उद्योजक राहणार असून गुंतवणूकीत त्यांचे केवळ १० टक्के योगदान राहील. उर्वरित ९० टक्के रक्कम त्यांना शेड्यूल बँका कर्ज रूपाने उपलब्ध करून देतील. पात्र लाभार्थींना केंद्र सरकार व्याज दरात ३ टक्के सवलत देईल.कर्जासाठी २ वर्षाच्या अधिस्थगन काळासह परतफेडीसाठी ६ वर्षाचा काळ उपलब्ध राहील. यासाठी केंद्र सरकार ७५० कोटीं रुपयांचा पत हमी निधी स्थापन करणार असून नाबार्ड त्याचे व्यवस्थापन करणार आहे. एमएसएमईच्या व्याख्येच्या मर्यादेत येणाऱ्या प्रकल्पांना याअंतर्गत पत हमी देण्यात येणार आहे. कर्जदाराच्या पत सुविधेच्या २५ टक्के पर्यंत हमी छत्र राहील. लाभ- पशु पालन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रचंड वाव आहे. पशुपालन पायाभूत विकास निधीसह खाजगी गुंतवणूकदारांसाठी व्याजदरात सवलत योजनेमुळे या प्रकल्पांना आवश्यक भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित होण्याबरोबरच गुंतवणुकदाराना वाढीव परतावा मिळण्यासाठी मदत होणार आहे. प्रक्रिया आणि पायाभूत मूल्य वर्धनामुळे निर्यातीलाही प्रोत्साहन मिळणार आहे. या क्षेत्राच्या विकासामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नावर थेट लक्षणीय सकारात्मक परिणाम होईल. अशाप्रकारे पशुपालन पायाभूत विकास निधीमार्फत १५००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे खाजगी गुंतवणूक अनेक पटींनी येण्याबरोबरच शेतकऱ्यानाही अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार आहे, त्यातून उत्पादकता वाढून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्याला मदत होणार आहे. या निधी मार्फत मंजूर झालेल्या उपाययोजनामुळे सुमारे ३५ लाख व्यक्तीसाठी थेट आणि अप्रत्यक्ष उपजीविका निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे. संदर्भ -Agrostar २५ जून २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
75
0
इतर लेख