AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता!
महाराष्ट्रावरील हवेचे दाब या आठवड्यात दक्षिणेस १००८ हेप्टापास्कल तर उत्तरेस १०१० हेप्टापास्कल इतके कमी राहण्याची शक्यता असल्याने कमाल व किमान तापमानात झालेली वाढ कायम राहणे शक्य असून ला निनाच्या प्रभावामुळे प्रशांत महासागराचे विषयवृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरी पेक्षा कमी राहण्यामुळे तेथे हवेचे दाब वाढून ते भारताच्या दिशेने लोटले जातील परिणामी लोटलेले बाष्पाचे ढग भारतातील बऱ्याच भागात जमून पावसाची शक्यता निर्माण करीत आहेत. त्यातूनच जेथे हवेचे दाब कमी राहत आहेत तेथे विजांच्या कडकडाटासह ऐन हिवाळ्यात पाऊस होत होण्याची शक्यता आहे. हा हवामान बदलाचाच परिणाम आहे. या पूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ला निनाच्या प्रभावामुळे नोव्हेंबर, डिसेंबर २०२० ते जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत भारतात व महाराष्ट्रात अवकाळी व अवेळी पावसाची शक्यता होईल असे यापूर्वी देखील वर्तविण्यात आले होते आणि ते आता खरे ठरत आहे. वरील हवामानाच्या अंदाजानुसार आपण आपल्या पिकाचे नियोजन करावे. उन्हाळी भुईमूग, भेंडी, उन्हाळी मूग, तीळ, वेलवर्गीय भाजीपाला लागवडीस हवामान अनुकूल बनले आहे. २) हरभरा पिकावरील घाटे अळीचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करावे. ३) गव्हाच्या पिकास वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे. ४) फळ बागांना आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. संदर्भ - डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
112
21
इतर लेख