कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा!
हवामान अपडेटअ‍ॅग्रोवन
कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा!
➡️ गुलाब चक्रीवादळ ओसरले असले, तरी त्याच्या प्रभावामुळे असलेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे (डिप्रेशन) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ➡️ महाराष्ट्रातील वादळी प्रणाली आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विखुरला गेला आहे. उत्तर कोकणापासून आंध्र प्रदेशापर्यंत असलेला पूर्व आणि पश्‍चिम दिशेने वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा वादळी प्रणालीच्या चक्राकार वाऱ्यांमध्ये मिसळून गेला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज 'ऑरेंज अलर्ट' ➡️ अरबी समुद्राकडे सरकत असलेल्या वादळी प्रणालीमुळे आज उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकण, उर्वरित मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही जोरदार पावसाचा, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जोरदार वादळी पाऊस (ऑरेंज अलर्ट) : कोकण : पालघर, ठाणे, रायगड. मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदुरबार, नाशिक. वादळी पाऊस, ( येलो अलर्ट) कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : जळगाव, नगर, पुणे, सातारा. मराठवाडा : औरंगाबाद. विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) महाराष्ट्र : कोल्हापूर, सांगली, सोलापूर. मराठवाडा : जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
120
9
इतर लेख