हवामान अपडेटअॅग्रोवन
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा!
➡️ पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आज कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
➡️ बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओडिशाच्या किनारपट्टीलगत कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली जमिनीवर आली असून, ती ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदबलीपासून पश्चिमेकडे २० किलोमीटर अंतरावर होती. छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. तर गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
➡️ राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा :
कोकण : पालघर.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (एलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार.
मराठवाडा : जालना, परभणी, हिंगोली.
विदर्भ : अकोला, अमरावती.
विजांसह पावसाचा इशारा (एलो अलर्ट) ः विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-अॅग्रोवन,
,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.