AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स
समाचारTV9marathi
केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स
तुम्ही देखील जनधन खाते उघडले असेल तर तुम्ही केवळ एक मिस्ड कॉल देऊन तुमच्या खात्यातील बॅलन् तपासू शकता. शिवाय तुमचं जनधन खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. पी एम जनधन खात्याअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. ही खातं झिरो बॅलन्स खातं आहे. याशिवाय ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डासहित अनेक सुविधा मिळतात. दोन पद्धतीने तपासा जनधन खात्यातील बॅलन्स तुम्ही दोन पद्धतीने तुमच्या जनधन खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. एक म्हणजे मिस्ड कॉल देऊन आणि दुसरं म्हणजे PFMS पोर्टलच्या माध्यमातून खात्यातील बॅलन्स तपासता येईल १. PFMS पोर्टलच्या माध्यमातून PFMS पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर भेट द्यावी लागेल. याठिकाणी Know Your Payment वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा खातेक्रमांक प्रविष्ट करावा लागेल. तुम्हाला दोन वेळा खातेक्रमांक एंटर करावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स समजेल २. मिस्ड कॉलच्या माध्यमातून तुमचे जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खाते आहे तर तुम्ही खात्यातील बॅलन्स मिस्ड कॉलच्या माध्यमातून माहित करून घेऊ शकता. याकरता तुम्हाला १८००४२५३८०० किंवा १८००११२२११ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुनच मिस्ड कॉल द्यावा लागेल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
11
इतर लेख