AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळ्याच्या सालीचे खत बनवण्याची पद्धत
टाकाऊ पासुन टिकाऊ MY महानगर
केळ्याच्या सालीचे खत बनवण्याची पद्धत
➡️केळीचे नियमित सेवन अनेक आजारांपासून सुटका मिळवून देते. केळ्याचे फायदे प्रत्येकाला माहित आहेत. केळी केवळ खाण्यासाठीच नव्हे तर शेतातील व घरी लावलेल्या झाडांना उपयोगी आहेत. ➡️केळीची साल वापरून तुम्ही तुमच्या गार्डनची माती सुपीक बनवू शकता. अशा मातीत तुमच्या घरची बाग अधिक बहरेल. जर तुम्ही नेहमी केळी खाऊन साल फेकून देत असाल तर थांबा. ➡️केळीच्या सालीत अनेक पोषण तत्व असतात. यामुळे शेतातील व घरी लावलेल्या झाडांना पोषण मिळते. म्हणून आज तुम्हाला केळीच्या सालीपासून खत बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. केळीच्या सालीपासून खत कसे बनवावे ? ➡️सर्वप्रथम केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून त्यात गरम पाणी मिसळा. हे पाणी थंड झाल्यावर झाडांना द्या. ➡️यामुळे केळीतील प्रथिने झाडांना मिळतील व झाडे लवकर वाढतील. ➡️दुसरी पद्धत म्हणजे केळीची साल पाण्यात उकळून घ्या. दोन आठवड्यानंतर हे पाणी झाडांना टाका. साल पाण्यात पूर्णपणे मिसळली नसेल तर पाणी आणखी काही दिवस तसेच ठेवा. ➡️तिसरी पद्धत म्हणजे केळीची साल खतात मिसळा. यासाठी साल कापून खतात मिसळून घ्या. काही दिवसांनी हे खत झाडांना टाका. यामुळे जमिनीत पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढून झाडे बहरतील. संदर्भ:- MY महानगर, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
8