कृषि वार्ताTech With Rahul
केळी पीक नुकसान भरपाई जाहीर!
🌱केळी पिक विम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी आणि इतर पीक क्षेत्रांची स्थळपाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
🌱केळी पीकाच्या नुकसानीबाबत शासनाकडून नुकसारभरपाई जाहिर केलेली होती, त्या अनुशंगाने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरीत करण्याकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबाबत जि.आर.सुध्दा काढण्यात आला आहे.
🌱संदर्भ:Tech with Rahul
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा