सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन!
➡️ केळी पिक हे पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे.
➡️ या पिकाच्या एकूण सर्वच अवस्थांमध्ये पाणी महत्वाचे असते.
➡️ योग्य वेळी, प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे. जमिनीचा प्रकार, तापमान, पिकाची अवस्था, वाऱ्याचा वेग या सर्व घटकांचा विचार करून पाणीमात्रा व वेळ ठरवावी.
➡️ वाफा पद्धतीच्या बागांना उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा करावा.
➡️ ठिबक सिंचन पद्धतीत संचाची नियंत्रित देखभाल व दुरुस्ती महत्वाची ठरते. लागवडीपासून ३ महिने पर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड साधारणतः ५ लिटर तर ४ ते ६ महिने पर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड १५ ते २० लिटर व त्या पुढील वयाच्या बागांना २५ ते ३० लिटर पाणी प्रती दिन प्रती झाड द्यावे.
➡️ हलक्या जमिनीत पाणी सरळ मुरते व ओलीतक्षेत्र टक्केवारी कमी असते. अश्या परिस्थितीत कमी पाण्यामुळे विकृती निर्माण होऊन वाईट परिणाम संभवतात. अशा वेळी जेथे पाणी पडते तेथे १ ते २ किलो शेणखत / गांडूळखत पसरावे. शिफारसीच्या मात्रेत पाणीपुरवठा केल्यास हवामानाच्या विपरीत घटकांच्या वाईट परिणामांची तीव्रता कमी होते.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.