AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस समस्या
गुरु ज्ञानAgroStar
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस समस्या
👉सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे केळी पिकावर कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या रोगामुळे पानांची अवस्था फिकट हिरवी ते पिवळसर होते, पानांचा आकार लहान होतो आणि पानांमध्ये वेडीवाकडी वाढ दिसून येते. रोगाची लक्षणे सर्वप्रथम नवीन पानांवर दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांमध्ये कमी फळधारणा होते आणि फळे पांढरी पडतात. 👉हा रोग मावा या रसशोषक किडीमुळे पसरतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काकडीवर्गीय पिकांच्या जवळ केळीची लागवड टाळावी. तसेच, पिकांची फेरपालट करणे आणि नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळणे आवश्यक आहे. 👉शेतात रोगग्रस्त झाडे दिसल्यास त्वरित उपटून नष्ट करावीत, जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही. मावा आणि इतर रसशोषक कीड नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य कीडनाशकांचा वापर करावा. यामुळे केळी पिकाचे आरोग्य आणि उत्पादन टिकवून ठेवता येईल. 👉स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
इतर लेख