AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस समस्या
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस समस्या
➡️. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे केळी पिकात कुकुम्बर मोझॅक हा विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ➡️ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने फिक्कट हिरवी व पिवळसर होऊन आकाराने लहान होतात व वेडीवाकडी वाढतात. ➡️या रोगाची लक्षणे प्रथम नवीन पानावर दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना कमी फळे लागतात व फळे पांढरी होतात. हा रोग मावा या रसशोषक किडीमुळे पसरला जातो. ➡️यावर प्रतिबंधात्मक उपाय म्ह्णून काकडीवर्गीय पिकांजवळ केळीची लागवड करणे टाळावे तसेच पिकांची फेरपालट करावी आणि नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर करणे टाळावा. ➡️शेतात रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास उपटून नष्ट करावीत आणि मावा व इतर रसशोषक कीड वेळीच नियंत्रित करावी. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
5