AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस समस्या!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक व्हायरस समस्या!
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे केळी पिकात कुकुम्बर मोझॅक हा विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने फिक्कट हिरवी व पिवळसर होऊन आकाराने लहान होतात व वेडीवाकडी वाढतात. या रोगाची लक्षणे प्रथम नवीन पानावर दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना कमी फळे लागतात व फळे पांढरी होतात. हा रोग मावा या रसशोषक किडीमुळे पसरला जातो. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्ह्णून काकडीवर्गीय पिकांजवळ केळीची लागवड करणे टाळावे तसेच पिकांची फेरपालट करावी आणि नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर करणे टाळावा. शेतात रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास उपटून नष्ट करावीत आणि मावा व इतर रसशोषक कीड वेळीच नियंत्रित करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
25
3