AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकातील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकातील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे व्यवस्थापन!
कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, उत्तर प्रदेश, ओडीशा अशा सर्व केळी उत्पादक राज्यामध्ये आढळून येतो.  रोगाची लक्षणे :- रोगाची लागण होताच झाडाचे नवीन येणाऱ्या पानावर पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसायला लागतात, पानाच्या शिरा जाड होतात, तसेच पाने अरुंद निघतात. बागेचे व्यवस्थापन चांगले असल्यास पाने मोठी निघतात परंतु पानावर क्लोरोटीक रेषा असतात. पानाच्या खालच्या बाजूने तेलकट रेषा दिसतात. पिवळ्या रेषा करड्या व तांबड्या होतात. बऱ्याच वेळा सिएमव्ही ग्रस्त झाडाची पोंगासड सुद्धा होते. व्हायरस ग्रस्त झाडाचे घड निकृष्ठ प्रतिचे व वेडेवाकडे निघतात. घडांचा विकास होत नाही. संपूर्ण झाड निकामी होते.  रोगाचा प्रसार :- कुकुंबर मोझेक व्हायरस रोगाचा प्राथमिक प्रसार रोग ग्रस्त कंदामार्फत होतो. तसेच रोगाचा प्रसार प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडीं मार्फत होतो. प्रामुख्याने, कापसावरील मावा, पांढरी माशी, फुल किडे, मक्यावरील मावा चवळी वरील मावा, मिरची वरील फुल किडे हे रोगाचे मुख्य वाहक आहेत.  रोगाचे पर्यायी होस्ट :- सिएमव्ही व्हायरसची निसर्गातील 810 वनस्पतींवर जोपासना केली जाते. त्याच प्रमाणे केना तण, घोळ, मिरची, मका,ऊस, चवळी, सोयाबीन या पिकांसह सर्व काकडी वर्गीय पिकांवर रोगाची जोपासना केली जाते व या वनस्पतीं वरून किडी मार्फत रोग केळीच्या झाडावर पसरतो. कॅमेलिना तण, धोतरा, शेवंती, झिनीया, दुधी, तरोटा, ढोबळी मिरची, तीळ यासारखे वनस्पती पिकांवर सीएमव्ही रोगाची जोपासना होते.  नियंत्रण :- केळीची बाग व्हायरस मुक्त ठेवण्यासाठी मशागतीच्या पद्धती व व्हेक्टरचे नियंत्रण महत्वाचे आहे. • केळी लागवडीसाठी रोग मुक्त व व्हायरस इंडेक्सिंग केलेल्या टिश्युकल्चर रोपांची लागवड करावी. • बाग तण मुक्त ठेवावी कारण अनेक तणे रोगाची जोपासना करतात. • बागेशेजारी मका, कापुस, चवळी, काकडी, घोसाळे, टोमॅटो, टरबुज, मिरची, ऊस या सारख्या पिकांची लागवड करु नये. • जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर, नोव्हेंबर व डिसेंबर च्या लागवडीवर सीएमव्ही रोग येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या लागवडीची विशेष काळजी घ्यावी. • रोगांचा प्रसार करणाऱ्या रसशोषक क़िडींचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. • सीएमव्ही रोगग्रस्त झाडातुन व्हायरस मुक्त होऊ शकत नाही त्यामुळे रोगग्रस्त झाडे उपटून टाकावी. • क्लोरोपायरीफॉस 45 मिली + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात किंवा असिटाप्रीड- 6 ग्रॅम + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात घेवून आठवड्याच्या अंतराने फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
14
इतर लेख