AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकातील आंतरमशागत - पिले कापणे
गुरु ज्ञानAgroStar
केळी पिकातील आंतरमशागत - पिले कापणे
👉केळीची लागवड केल्यानंतर 🌱 दोन ते तीन महिन्यांनी पिलांची वाढ होऊ लागते. पिलांची वाढ नियंत्रित करणे आवश्यक आहे, कारण ती मुख्य झाडाच्या विकासावर परिणाम करू शकते. पिलांची छाटणी: 1- दर 15 दिवसांनी पिलांची छाटणी विळ्याने किंवा धारदार कोयत्याने करावी. 2- झाडाच्या खोडाला व मुळांना इजा न होऊ देता पिलांचा कोंब खालून कापावा. बुरशीनाशकाची फवारणी: 1- छाटणीनंतर पिलांच्या कापलेल्या भागावर बुरशीनाशकाची फवारणी करावी. 2- यामुळे झाडावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि मुख्य खोडाचा चांगला विकास होईल. मुख्य खोडाचा विकास: 1-पिले काढल्यानंतर मुख्य झाडाला अधिक पोषण मिळते, ज्यामुळे त्याचा खोड मजबूत आणि उत्पादनक्षम होतो. 🍌 हे उपाय केल्यास केळीच्या झाडाचा दर्जा सुधारतो आणि उत्पादनात वाढ होते. 🌿 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख