AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यानविद्याअन्नदाता कार्यक्रम
केळी पिकाचे व्यवस्थापन
• केळी पिकामध्ये घडांचा/फळांचा आकार, प्रत एकसारखी होण्यासाठी पिकाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. • केळी पिकाची लागवड करताना खते प्रति झाड या प्रमाणात द्यावे. जसे कि, शेणखत @२५ किलो, पोटॅश @१०० ग्रॅम, युरिया @२०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. • उन्हाळ्यामध्ये पिकाची पाण्याची आवश्यकता पाहून पाण्याचे योग्य नियोजन करावे. • पिकातील आंतरमशागत म्हणजेच खुरपणी करून तण नियंत्रण करावे. • ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याचा अपव्यय होत नाहीच त्याचा बरोबर तण देखील नियंत्रित राहते. • अधिक तापमान असल्यास आणि आपण पिकास पाट पाणी देत असल्यास दोन पाण्याच्या पाळीमध्ये ५ ते ६ दिवसांचे अंतर ठेवावे. • मुख्य झाडाला काही नवीन मुनवे फुटले असतील तर त्यातील एकच मुनवा ठेवून उर्वरित काढून टाकावे त्यामुळे केळी घडाची वाढ चांगली होते.
संदर्भ:- अन्नदाता हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
94
8