अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय!
🍌🌱घड पुर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे. घडावर 8 ते 10 फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीने सुरवातीलाच कापुन टाकाव्यात.
🌱फळांच्या आकारमानात सकारात्मक बदल होवून घड लवकर परिपक्व व्हावा, यासाठी फण्यांची वेळीच विरळणी करणे आवश्यक आहे.
🌱फुलकिडी या किडीचे नियंत्रणासाठी केळफुल बाहेर पडतेवेळी किंवा शेवटचे पान बाहेर पडताच डायमेथोएट 30 टक्के @ 1 मिली प्रति लिटर पाणी स्टिकरसह फवारणी करावी.
🌱अन्नद्रव्ये व्यवस्थापना मध्ये घड पुर्ण निसवल्यावर 13:00:45 -4 किलो व कॅल्शिअम नायट्रेट 4 किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकमधून आलटून पालटून द्यावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.