AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय!
"घड पुर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे. घडावर 8 ते 9 फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीने सुरवातीलाच कापुन टाकाव्यात. फळांच्या आकारमानात सकारात्मक बदल होवून घड लवकर परिपक्व व्हावा, यासाठी फण्यांची वेळीच विरळणी करणे आवश्यक आहे. फुलकिडी या किडीचे नियंत्रणासाठी केळफुल बाहेर पडतेवेळी किंवा शेवटचे पान बाहेर पडताच डायमेथोएट 30 टक्के @ 1 मिली प्रति लिटर पाणी स्टिकरसह फवारणी करावी.अन्नद्रव्ये व्यवस्थापना मध्ये घड पुर्ण निसवल्यावर 13:00:45 4 किलो व कॅल्शिअम नायट्रेट 4 किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकमधून आलटून पालटून द्यावे.👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा"
28
7