AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केरळमधील ‘सूर्यफूल राजदूत’!
द बेटर इंडियाद बेटर इंडिया
केरळमधील ‘सूर्यफूल राजदूत’!
केरळ राज्यातील अलाप्पुझा जिल्ह्यातील कांजिक्कुझी येथील रहिवासी सुजित स्वामी निकार्थिल यांनी चक्क आपल्या जमिनीवर सूर्यफुलाची यशस्वी शेती केली आहे. ते ही केरळमध्ये त्यांनी अशक्यचे शक्य करून दाखविले. पहिल्या हंगामात त्यांनी शेतात ६० दिवसांत साधारण ६,००० ते ८,००० सूर्यफुले फुलवली. त्यांना याचा गजब फायदा फुलांच्या विक्रीतून नव्हे, तर ‘सूर्यफूल पर्यटन’मधून झाला! कांजीकुळी या छोट्याशा गावात हजारो सोनेरी सूर्यफुलांचे दर्शन सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरले. शेताची एक झलक पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी आणि फोटोशूटचे आयोजन करण्यासाठी राज्यभरातून लोकांची गर्दी होऊ लागली. जेव्हा गर्दी वाढू लागली, तेव्हा सुजित यांनी आपल्या शेताला साड्या आणि जाळी वापरून तात्पुरते कुंपण घातले आणि १० रुपये नाममात्र शुल्क आकारून तिकीट स्टॉल लावले. २०२० मध्ये जवळपास १ लाख लोकांनी फार्मला भेट दिली. सुजित सांगतात. “मी केरळच्या बाहेरून सूर्यफूल तेलासाठी योग्य असलेल्या संकरित सूर्यफुल बियाणे आणले आणि प्रथम त्यांची पेरणी केली. रोपे १०-१२ दिवसांचे झाल्यावर ते रांगेत लावले. प्रत्येक नवीन हंगामासाठी बियाणे आणि रोपांसाठी ताजे संच वापरले. मी खुल्या अचूक शेतीचे तंत्र देखील वापरले आहे, ज्यामध्ये मल्चिंग शीट वापरून रोपे वाढविली जातात. आता, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक शेतकरी सूर्यफूलाच्या शेतीकडे वळाले. हे खरचं त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या त्यांना ‘सूर्यफूल राजदूत’ म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- द बेटर इंडिया, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
11
1