AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केरळच्या पानमळाला मिळाले जीआई टॅग
कृषी वार्ताAgrostar
केरळच्या पानमळाला मिळाले जीआई टॅग
केरळच्या पानमळाला जीआई टॅग प्रदान करण्यात आले आहे. यासोबतच तामिलनाडू राज्यातील पालनी शहरचे पलानी पंचामिर्थम, उत्तर पूर्वी राज्य मिजोरामचे तल्लोहपुआन व मिजोपुआनचेई यांना जीआई टॅग प्रदान करून त्यांची नोंददेखील करण्यात आली. उदयोग व आंतरिक व्यापार संवर्धन विभागाच्या अनुसार त्यांनी नुकतेच वेगवेगळया चार प्रकारच्या नवीन भौगोलिक संकेतांची नोंद केली आहे. जीआई टॅगची ओळख त्या उत्पादनांना दिली जाते, जी एका विशिष्टय भौगोलिक क्षेत्रात आढळतात. त्याचबरोबर त्यामध्ये तेथील स्थानिय वैशिष्येदेखील असतात. जीआई टॅग लागल्यानंतर त्या उत्पादनाची खास ओळख निर्माण होते. जीआई टॅगच्या कोणत्याही उत्पादनाला खरेदी करण्यावेळी ग्राहक त्याची वैशिष्टये व गुणवत्ताविषयी अधिक विश्वासू असतात. जीआई टॅगवाले उत्पादन ग्रामीण भागात अधिक फायदेशीर असतात. कारण शेतकऱ्यांना यापासून अधिक उत्पन्न मिळते. संदर्भ – Agrostar, २२ ऑगस्ट २०१९
40
0
इतर लेख