कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केद्र शासन बनविणार अधिक डाळींचा बफर स्टॉक
नवी दिल्ली: चालू पीक हंगाम २०१९-२० मध्ये केंद्र सरकारने मुल्य स्थिरीकरण निधी (पीएसएफ) योजनेअंतर्गत डाळींचा बफर स्टॉक २०.७४ टक्क्यांची वाढ करून १९.५० लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. जे की मागील वर्षी पीक हंगामात १६.१५ लाख टन डाळींचा बफर स्टॉक केला होता.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयात सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुल्य स्थिरीकरण निधी व्यवस्थापन समितीच्या (पीएसएफएमसी) डाळींच्या बफर स्टॉकमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. डाळवर्गीयांच्या बफर स्टॉकमध्ये सर्वात जास्त हिस्सा तूर १० लाख टन, उडीद ४ लाख टन, मसूर १.५० लाख टन, मूग १ लाख टन व हरभरा ३ लाख टनचा स्टॉक असेल. केंद्र सरकार पीएसएफ अंतर्गत डाळींच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने डाळींचा बफर स्टॉक तयार करते आणि बाजारात किंमती वेगाने वाढल्यास बफर स्टॉकमधील उपलब्धता वाढवून किंमतींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. नुकतेच ग्राहक मंत्रालयाने बफर स्टॉकमधून राज्यांना ८.४७ लाख टन डाळीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. संदर्भ- आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, १४ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
56
0
संबंधित लेख