AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाख रुपये!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत,
केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाख रुपये!
➡️ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेता आता नवीन कृषी विधेयक आणल्यानंतर सरकार शेतीला मोठा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना हे मोठी भेट देणार आहे. नवीन शेतकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार आहे. सरकारकडून ही प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. याकरता शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल. कसे मिळतील 15 लाख? ➡️ सरकारने पीएम किसान एफपीओ स्कीम ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइझेशनला 15 लाख रुपये दिले जातील. या स्कीमअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक ऑर्गनायझेशन कंपनी बनवावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांना कृषिसंबंधित उपकरणं किंवा फर्टिलायझर्स, वीज किंवा औषधं खरेदी करणं सोपं होईल. वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय? पंतप्रधान किसान एफपीओ योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या थांबावं लागणार आहे. कारण सरकारने अद्याप या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. लवकरच यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकार लवकरच यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. शेतकऱ्यांना मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ सरकारने गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू केलेल्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
10
इतर लेख