कृषि वार्ताअॅग्रोवन
केंद्र शासन करणार कडधान्याचा पुरवठा
नवी दिल्ली – खरीप हंगामात कडधान्याचे उत्पादन घटल्याने बाजारात डाळींचे दर वाढले आहेत. दर नियंत्रणासाठी किंमत स्थिरीकरण योजनेतून केंद्र शासनाने राज्यांना बफर स्टॉकमधील 8 लाख 47 हजार टन कडधान्य पुरवठयाची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या निवेदनातून मिळाली. शासन बाजारातील सरासरी दरावर कडधान्य देणार आहे.
खरिप हंगामात उशिरा दाखल झालेल्या मान्सूनमुळे कडधान्य पेरणीला उशीर झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्याचबरोबर पीक काढणीच्या काळात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मूग व उडीद पिकांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे बाजारात हरभऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे. मागील वर्षी खरीपात 86 लाख टन कडधान्य उत्पादन झाले आहे. त्यातुलनेत यंदा 82 लाख टन उत्पादन झाले आहे. खरिपातील घटलेल्या उत्पादनाचा परिणाम रब्बीतील कडधान्याच्या दरावर झाला आहे. बाजारात दर वाढले असून, केंद्र शासनाने दर नियंत्रणासाठी हालचाली करत आहे. केंद्र शासनाने 2018-19 मध्ये कडधान्याचा 14 लाख टन बफर स्टॉक केला होता. त्यापैकी 8 लाख 47 हजार राज्यांना वाढते दर नियंत्रणासाठी देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, 20 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
87
0
इतर लेख