AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केंद्र शासनाने कृष्णापुरम जातीच्या कांदयाच्या निर्यातीला दिली परवानगी
कृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
केंद्र शासनाने कृष्णापुरम जातीच्या कांदयाच्या निर्यातीला दिली परवानगी
केंद्र शासनाने काही अटींसह आंध्र प्रदेशातील कृष्णापुरम जातीच्या १० हजार टन कांदयाला निर्यातीसाठी परवानगी दिली. अन्य कांदयाच्या जातींवर अदयाप ही निर्यातीसाठी बंदी घातली आहे. कृष्णापुरम कांदा हा आकार आणि तिखटपणामुळे स्वयंपाकघरात वापरला जात नाही, याची आयात थायलंड, हाँगकाँग, मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापूर या देशात केली जाते._x000D_ परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कृष्णापुरम जातीच्या १०,००० टन कांद्याची निर्यात, ३२ मार्च २०२० पर्यंत करण्याची परवानगी दिली. याची निर्यात केवळ चेन्नई बंदरगाहवरून केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार निर्यातदारास कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीसाठी आंध्र प्रदेश सरकारच्या बागायती विभागाकडून निर्यात प्रमाणपत्र घ्यावे लागेल. डीजीएफटीने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की चेन्नईस्थित डीजीएफटी कार्यालय एकूण निर्यातीची नोंदणी करावी लागणार आणि त्या आधारे निर्यातदारांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जातील._x000D_ संदर्भ - इकॉनॉमिक टाइम्स, ६ फेब्रुवारी २०२० _x000D_
42
0
इतर लेख