AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यंत्रावर 80% सबसिडी!
योजना व अनुदानAgrostar
कृषी यंत्रावर 80% सबसिडी!
👉🏼केंद्राबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक योजना राबवल्या जात आहेत. यापैकीच एक महत्वाची मानली जाणारी योजना म्हणजे ‘स्माम’ योजना। ""सब-मिशन ऑन अॅग्रिकल्चरल मेकॅनायझेशन"" (SMAM) योजनेअंतर्गत, केंद्र सरकारकडून आधुनिक शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना 50 ते 80 टक्के अनुदान मिळते. 👉🏼लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: सातबारा, आधार कार्ड, राहण्याचे प्रमाणपत्र, 8 ‘अ’, बॅंक पासबूक, मोबाईल नंबर, जातीचा दाखला आणि पासपोर्ट साईजचा फोटो अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. 👉🏼स्माम या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करावे लागणार आहे 👉🏼याठिकाणी Registration असा पर्याय समोर येईल. तेव्हा त्यामध्ये शेतकरी (Farmer) हा पर्याय निवडावा लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज समोर येईल. 👉🏼या पेजवर नोंदणी करावी लागणार आहे. 👉🏼यामध्ये तुमते नाव, आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. 👉🏼त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. 👉🏼अखेर Submit यावर क्लिक केल्यावर तुमची नोंदणी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण होईल. 👉🏼संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
81
22
इतर लेख