AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी पंपाच्या बिलाबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नवे आदेश जाहीर.
कृषी वार्तान्यूज18
कृषी पंपाच्या बिलाबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नवे आदेश जाहीर.
👉राज्यात कृषी आणि घरगुती वीज बिल थकीत असल्याने महावितरण विभागाच्यावतीने वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्यामुळे सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 👉त्यामुळेच आता कृषी पंपाबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. 👉राज्य सरकारच्या ऊर्जा मंत्रालय विभागाने दोन पावलं मागे जात शेतकऱ्यांना तूर्तास थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 👉कृषी वीज पुरवठा तोडण्या वरून नाराजी वाढत असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थोडीशी सौम्य भूमिका घेत कृषी पंप धारकांची थकबाकी सप्टेंबर २०२० च्या बिलात गोठवण्यात आले असून त्यासाठी वीज पुरवठा खंडीत करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 👉सप्टेंबर २०२० पासून चालू बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस द्यावी व गरज असेल तरच वीज खंडित करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. संदर्भ - न्यूज १८ लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
131
47
इतर लेख