AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 कृषी टॉप बुलेटिन!
कृषी वार्ताAgroStar India
कृषी टॉप बुलेटिन!
केळी उत्पादकांना मिळाला पीकविमा; दोन वर्षांच्या संघर्षानंतर यश, दिवाळी होणार गोड अकोला जिल्ह्यात सन २०१९-२० च्या हंगामात वादळ वाऱ्यामुळे अकोट तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मदत म्हणून सुमारे २६८ शेतकऱ्यांना ६५ लाखांची मदत बुधवारी (ता.२७) बँक खात्यात जमा झाली. हेक्टरी २६४०० रुपयांची नुकसानभरपाई मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बीडमध्ये सुरू होणार रेशीम कोष खरेदी; प्रक्रिया उद्योगास वाव सतत विस्तारणाऱ्या व संकटात शेतकऱ्यांना शाश्वत आधार देणाऱ्या रेशीम उद्योगांतर्गत मराठवाड्यातील बीड येथे रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू होणार आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशीम विभागाच्या समन्वयातून व रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीतून कोष खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही बाजारपेठ सुरू करण्याच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मराठवाड्यातील रेशीम उद्योगात बीड जिल्ह्याची आघाडी आहे. जिल्ह्यात जवळपास ३५९३ शेतकरी असून ३७८६ एकरांवर तुती लागवड आहे. २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात ६५० टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले तर चालु वर्षी जवळपास ७०० टन रेशीम कोष उत्पादन अपेक्षित आहे. आशिया विकास बँककडून महाराष्ट्राला १०० दशलक्ष डॉलरच्या कर्जाची मंजुरी आशिया विकास बँक (एडीबी) आणि भारत सरकारमध्ये झालेल्या करारानुसार महाराष्ट्रातील कृषी व्यवसाय साखळीद्वारे कृषी उत्पन्न वाढ आणि अन्न नासाडी कमी करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलरच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कृषी व्यवसाय साखळीसाठी या करारावर सह्या झाल्या आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कृषी व्यवसाय विकासाला चालना मिळणार आहे. तसेच उत्पादनात वाढ, पीक मळणीनंतर सुविधा आणि फळपीक उत्पादकांसाठी विपणनाची पुरेशी साखळी उभारली जाणार आहे. अंबिया बहाराच्या फळपीक विमा नोंदणीला सुरुवात राज्यात अंबिया बहारासाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अवेळी पाऊस, जादा तापमान, अतिपाऊस किंवा गारपिटीपासून फळपिकांना विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा या योजनेत आहे. अंबिया बहाराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई आणि स्ट्रॉबेरी ही पिके असतील. केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in संकेतस्थळावर विमा नोंदणी करता येईल. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
0
इतर लेख