AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर - उपराष्ट्रपती
कृषि वार्ताAgrostar
कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर - उपराष्ट्रपती
मुंबई: आजही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असल्याने देशात येणारी गुंतवणूक आणि उद्योगांचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर असणे आवश्यक आहे. यामुळे शाश्वत शेती व सुनिश्चित रोजगार यासाठी आश्वासक पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मुंबई येथे सी.आय.आय. या औद्योगिक संस्थेच्या शिखर संस्थेची २५ वी वार्षिक भागीदारी परिषद (सीआयआय पार्टनरशिप समिट-२०१९) ‘न्यु इंडिया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ च्या उद्घाटनप्रसंगी मांडले. नायडू म्हणाले, कृषी क्षेत्राला फायदेशीर आणि टिकाऊ बनविणे आवश्यक आहे. यासाठी कुक्कुट, बागकाम आणि मासेमारीसारख्या पूरक व्यवसायांना ही प्रोत्साहन दिले पाहिजे. कृषी सह कृषीमालाचे मुल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. याशिवाय संशोधनावर लक्ष केंद्रीत करून देशातील सुरक्षित अन्न उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, तसेच गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे.
60
0
इतर लेख