AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी इस्त्राईलशी सहकार्य करार!
स्मार्ट शेतीtv9marathi
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी इस्त्राईलशी सहकार्य करार!
➡️ भारतातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी इस्त्राईल आणि केंद्र सरकार यांच्यात तीन वर्षीय विकास कार्यक्रमाबाबत करार झाला आहे. इस्त्राईल भारताला शेती विकासासाठी 1993 पासून सहकार्य करत आहे. दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान आदान प्रदान करण्यासोबत उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.भारत आणि इस्त्राईल शेती आणि जलसंधारण क्षेत्रात काम करतील. नव्या तीन वर्षांच्या कार्यक्रमामध्ये काय आहे? ➡️ इस्त्राईलनं पुढील तीन वर्षांमध्ये शेती क्षेत्रातील सेंटर ऑफ एक्सलन्सची संख्या वाढवणे, नवीन केंद्र स्थापन करणे, त्या केंद्रांना आत्मनिर्भर करण्यासाठी सहयोग देण्याचं ठरवलं आहे. इंडो-इस्त्राईल विलेजस ऑफ एक्सलन्स ही एक नवीन संख्या आहे. यामध्ये 8 राज्यांच्या 75 गावांमध्ये 13 केंद्र उभारण्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारतातील पारंपारिक गावं आधुनिक शेती केंद्रात बदलली जातील. नरेंद्र तोमर काय म्हणाले? ➡️ केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी इंडो-इस्त्राईल अ‌ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम विषयी बोलताना हा पाचवा कार्यक्रम असल्याचं सांगतिल. पहिला डेव्हलपमेंट पोग्राम 2008 मध्ये सुरु झाला होता. त्यांनतर आतापर्यंत चार प्रोग्राम पूर्ण झाल्याचं देखील त्यांनी सांगितले. इस्त्राईल तंत्रज्ञानावर आधारीत सुरु करण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स ह यशस्वी ठरल्यांचं देखील त्यांनी सांगितले. ➡️ इस्त्राईलच्या सहकार्यांनं भारतामध्ये इंडो-इस्त्राईल एक्सलन्स प्रोग्राम राबवण्यात येत आहे. भारतात इस्त्राईलनं विकसित केलेल्या ड्रिप सिंचनामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. इस्त्राईलच्या सहकार्यानं भारतात 12 राज्यांमध्ये 29 सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यरत आहेत. यामधून भाज्या आणि फळ झाडांची निर्मिती केली जात आहे. फळबागा लावणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाते. दरवर्षी किमान 1.2 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
6