AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 कृषी कर्जावरील सर्व सेवा शुल्क माफ!
कृषि वार्ताAgrostar
कृषी कर्जावरील सर्व सेवा शुल्क माफ!
➡️शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर मात करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सरकार कृषी कर्ज सुलभतेने उपलब्ध करून देत आहे.आता केंद्र सरकारने 3 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ केले जाणार असल्याचे सांगितले आहे. किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जावर ही सुविधा लागू असेल. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वेगाने पावले उचलत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी लोकसभेत दिली. ➡️शेतकऱ्यांना शेतीमधील कामांमध्ये आर्थिक मदत व्हावी याकरिता सरकार अनेक बदल करत आहे. सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आर्थिक संकट लक्षात घेऊन किसान क्रेडिट कार्ड कर्ज किंवा पीक कर्जा करिता सेटलमेंट, दस्तऐवज, सर्वेक्षण, अकाउंट बुक फ्री आणि इतर प्रकारच्या सेवांसह सर्व आवश्यक सेवा दिल्या असून तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्जाचे सेवा शुल्क माफ करण्यास देखील सांगितले आहे. ➡️एवढेच नाही तर रिझर्व बँकेने हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक लाख रुपयांवरून 1.6 लाख रुपये केली आहे. तर बँका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या कर्ज मूल्यांकन प्रक्रियेत एक किंवा अधिक क्रेडिट माहिती कंपन्यांकडून क्रेडिट माहिती अहवाल मिळवण्यासाठी कर्ज धोरणांमध्ये योग्य तरतुदी समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे सिस्टम मध्ये उपलब्ध माहितीच्या आधारावर आता कर्जासंबंधीचे योग्य निर्णय बँकांना घेता येणार आहे. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
1
इतर लेख