कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी उत्पादनाच्या निर्यातीमध्ये १०.६० टक्के घट
चालू वित्त वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तीन महिन्यात कृषी उत्पादनाच्या निर्यातीमध्ये १०.६० टक्के घट झाली आहे. कृषी व प्रसंस्कृत खादय उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) च्या अनुसार चालू वित्त वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तीन महिन्यात बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये ४३.५१ टक्क्यांची घट होऊन एकूण निर्यात ११. ९४ लाख टन झाले आहे. जे की मागील वित्त वर्षी समान कालावधीत २१ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली होती. मुल्यनुसार पहिल्या तीन महिन्यात बिगर बासमती तांदळाची निर्यात ३,३७९ करोड रूपये आणि बासमती तांदळाची निर्यात ८,७२८ करोड रूपये झाला आहे. जे की मागील वित्त वर्षी समान कालावधीत याची निर्यात क्रमश ५,९८२ व ८,६१० करोड रूपये झाली होती. तथापि, ताज्या फळांच्या निर्यातीमध्ये चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात सुधारणा झाली आहे. एप्रिल ते जून २०१९-२० च्या कालावधीत यांच्या निर्यातीच्या प्रमाणात १,८७,२४६ टनचे १,३७६ करोड रूपयांचे झाले. गवार उत्पादनाची निर्यात २०१८-१९ च्या पहिल्या तीन महिन्यात एप्रिल ते जून दरम्यान १,३५,२१० टन घट होऊन चालू वित्त वर्षामध्ये १,२७,७०० टन ही झाली आहे. मुल्यनुसार निर्यात मागील वर्षी १,२३९ करोड रू. घट होऊन १,१४२ करोड रूपये झाली आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १२ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
31
0
इतर लेख